अर्रे लोगो | |
प्रकार | खाजगी |
---|---|
उद्योग क्षेत्र | करमणूक, इन्फोटेनमेंट, डिजिटल सामग्री (मीडिया) |
स्थापना | 1 फेब्रुवारी 2015मुंबई, महाराष्ट्र, भारत | मध्ये
संस्थापक |
बी. साई कुमार अजय चाको संजय राय चौधरी |
उत्पादने | ओवर-द-टॉप मीडिया सर्व्हिसेस,ट्रायल बाय एरर: आरुषी फायली, आयशा - माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड, हो हो री-जेंडर, ऑफिशियल चुकियागिरी, ऑफिशियल सीईओगिरी (सीझन) ऑफिशियल चुकियागिरी २, फितूर मिश्रा |
सेवा | स्केच कॉमेडी, वेब-मालिका, संगीत व्हिडिओ, ऑडिओ मालिका, माहितीपट, मजकूर |
कर्मचारी | ३५ |
पालक कंपनी | यु डिजिटल कंटेंट [१][२] |
संकेतस्थळ | Arre |
अर्रे ही मुंबई स्थित एक भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मची कंपनी आहे.[३] ही कंपनी त्याच्या ऑनलाइन चॅनेलद्वारे व्हिडिओ, ऑडिओ मालिका, वेब मालिका, माहितीपट, मजकूर आणि डूडल तयार करून प्रकाशित करते.[४] माजी नेटवर्क १८ आणि टीव्ही १८ चे कार्यकारी अधिकारी बी. साई कुमार, अजय चाको आणि संजय रे चौधरी यांनी स्थापित केलेली ही सामग्री-आधारित स्टार्टअप आहे. ही एप्रिल २०१६ मध्ये सुरू झाली.[१][५]
नेटवर्क टीव्ही १८ चे माजी सीईओ - बी. साई कुमार, सीओओ - अजय चाको आणि दिग्दर्शक संजय रे चौधरी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये हा "ऑनलाईन" ब्रँड तयार केला.[१][६] "अर्रे" हा एक भारतीय बोलीतील उद्गार आहे जो साधारणपणे इंग्रजीतील "वोहा" (whoa) सारखा अनुवादित होतो.[३][४]
एप्रिल २०१६ मध्ये, एनम समूहाने आणि संस्थापकांसह अर्रे मध्ये अज्ञात रक्कम गुंतविली.[७][८]