ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, आणि वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत.[२]प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो. साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.[३]