हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[१] या २G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[२] या निकाला नंतर “माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला.[३]