Indian physiologist (1925-2004) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २४, इ.स. १९२५ मोगौक | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २१, इ.स. २००४ दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
सदस्यता |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
औतार सिंग पेंटल (२४ सप्टेंबर १९२५ - २१ डिसेंबर २००४) हे एक वैद्यकीय शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूरोसायन्सेस आणि रेस्पीरेटरी सायन्सेसच्या क्षेत्रात अग्रगण्य शोध लावले.[१] रॉयल सोसायटी, लंडनचे फेलो बनणारे ते पहिले भारतीय फिजिओलॉजिस्ट आहेत.
त्यांनी लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून शरीरविज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
एडिनबर्ग विद्यापीठात डेव्हिड व्हिटरिज यांच्या देखरेखीखाली पेंटलने पीएचडी पूर्ण केली.
१९५३ मध्ये पेंटल भारतात परतले आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे दाखल झाले. पुढे ते वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूटचे संचालक झाले. दिल्लीच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसचे ते पहिले प्राचार्यही होते. [२] त्यानंतर पेंटल यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे महासंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि ते सोसायटी ऑफ सायंटिफिक व्हॅल्यूजचे संस्थापक अध्यक्षही होते. [३]