?करमाळा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राशिन |
विभाग | पश्चिम महाराष्ट्र |
जिल्हा | सोलापूर |
भाषा | मराठी |
तहसील | करमाळा |
पंचायत समिती | करमाळा |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413202 • MH45 |
करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. करमाळा हे नगरपरिषद असलेले शहर आहे. ही स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांची कर्मभूमी आहे.
करमाळा हे कमलादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.[१] हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते. या मंदिरात ९६ या अंकाचे खूप महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. येथे नवरात्रीचा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत येथे वार्षिक यात्रा असते. कमलादेवी मंदिराच्या इतिहासवर येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांनी जय अंबे कमलाभवानी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कमलादेवीच्या भव्य मंदिराची आणि करमाळा परिसराच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती आहे.
करमाळा तालुक्यातील बाळेवाडी ही सीना नदीकाठावरील संत यादवबाबांची जन्मभूमी आहे.
करमाळा हे शहर अहमदनगर - सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. करमाळा हे करमाळा तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे कमलाभवानी प्राचीन मंदिर आहे या शहरात ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.
तसेच तेथुन वाहतूक ही मोठी आहे. अहमदनगर - सोलापुर या राष्ट्रीय महामार्गवरून नाशिक - मनमाड - धुळे - मालेगाव - शिर्डी या ठिकाणी जाता येते. तसेच मुंबई - पुणे - राशिन भिगवण - बारामती - दौंड - सातारा - पंढरपुर टेंभुर्णी - बार्शी - तुळजापुर - धाराशिव - कुर्डुवाडी सोलापुर - अहमदनगर - कर्जत - जामखेड या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहेत.
करमाळा तालुक्यातील काही गावे (वर्णानुक्रमे):
बाळेवाडी, वीट,अंजनडोह,कामोणे, कुंभेज, केम, कोंढेज, गुळसडी, खडकी (करमाळा), खडकेवाडी, जेऊर, तरटगाव, देवळाली, पांगरे, पांडे, पुनवर, भोसे, मांगी, वरकटणे, शेलगाव, सर्पडोह, साडे, घोटी, सालसे, निमगांव
हिंगणी, पारेवाडी, सौंदे, रावगाव, बोरगाव, खांबेवाडी, पाडळी, घारगाव, निलज, पोथ्रे, वांगी, जिंती, भिलारवाडी, देलवडी, उंदरगाव, निमगांव
निंभोरे, जेऊरवाडी, कोंढेज, मलवडी, पाथुर्डी, कंदर, बिटरगाव, गुळसडी (गुरसुळी), शेटफळ, पांडे, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सातोली, वडशिवणे, ढोकरी, वांगी-1 ते 4, उमरड,पु.सोगाव वाशिंबे, केत्तुर, पोमलवाडी, खडकेवाडी,केडगांव, लव्हे , कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हण, पोथरे , खातगाव, मांजरगाव , कात्रज, कोंढार चिंचोली, टाकळी , कोर्टी , विहाळ , मोर्वाड , कुगाव बिटरगाव , गोयेगाव , कंदर , पांडे , अर्जुननगर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |