Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १४, इ.स. १९७० बरेली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कविता सेठ (जन्म १४ सप्टेंबर १९७०) ही एक भारतीय गायिका आहे, जी हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून ओळखली जाते. तसेच ती गझल आणि सुफी संगीताची कलाकार म्हणून ओळखली जाते आणि कारवान ग्रुप या सुफी संगीत समूहाचे नेतृत्व करते.[१] ती सध्या मुंबई, भारतात आहे.
तिने दोनदा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे. २०१० मध्ये तिच्या वेक अप सिड (२००९) चित्रपटाच्या "इकतारा" या शास्त्रीय सुफी गायनासाठी पहिला फिल्मफेअर मिळाला होता.[२] तिने सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनाचा स्टार स्क्रीन अवॉर्ड देखील जिंकला. हे २००९ मध्ये सर्वात मोठ्या चार्टबस्टर्स गाण्यांपैकी एक होते.[३][४] २०२३ मध्ये जुगजुग जीयो (२०२२) चित्रपटाच्या " रंगीसारी " गाण्यासाठी पुन्हा तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
कविता सेठ जन्म बरेली, उत्तर प्रदेश [३] येथे एका बँक अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिला दोन मुलगे आहेत, कविश सेठ आणि कनिष्क सेठ, दोघेही तिच्यासोबत काम करतात व संगीतकार आहे.[५] १५ डिसेंबर २०११ रोजी तिचे पती के.के.सेठ यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या दाहामुळे निधन झाले.[६]
कविता सुफी शैलीतील गायनात माहिर आहे, जरी ती गीत, गझल आणि लोकगीते देखील गाते. गेल्या काही वर्षांत तिने लंडन, बर्मिंगहॅम, स्कॉटलंड, बर्लिन, ओस्लो आणि स्टॉकहोम आणि भारतभरातील लाइव्ह शोमध्ये गाणे साकारले आहे. दिल्लीतील मुझफ्फर अलीच्या आंतरराष्ट्रीय सुफी महोत्सवाच्या मैफिलीत तिच्या एका कार्यक्रमामध्ये, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी तिला ऐकले आणि त्यांच्या चित्रपटातील "जिंदगी को मौला" हे गाणे गायला दिले. अमिषा पटेल अभिनीत वादा (२००५) या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून तिचे असे पदार्पण झाले.[१][७] त्यानंतर, ती मुंबईला स्थानांतरित झाली व त्यानंतर अनुराग बसूच्या गँगस्टर (२००६) मध्ये "मुझे मत रोको" गीत गायले ज्यासाठी तिला प्रशंसा मिळाली.
गाण्यासोबतच ती संगीतही देते. तिने एन. चंद्रा यांच्या ये मेरा इंडिया (२००९) चित्रपटात तीन गाणी संगीतबद्ध केली आहेत.[८] तिने खाजगी अल्बम देखील जारी केले आहेत, ज्यात वो एक लम्हा, दिल-ए-नादान असे दोन्ही सुफी गझल अल्बम आहेत. त्यानंतर सुफी संगीत अल्बम, सुफियाना (२००८) आणि हजरत हे प्रकाशित केले आहे. तिचा २००८ चा अल्बम सुफियाना, ज्यात सुफी कवी, रुमीच्या दोन कविता आहे, हा लखनौमधील ८०० वर्ष जुन्या खमन पीर दर्गाह येथे प्रकाशीत केला होता.[९]
२०१० मध्ये तिच्या वेक अप सिड (२००९) चित्रपटाच्या "इकतारा" या शास्त्रीय सुफी गायनासाठी पहिला फिल्मफेअर मिळाला होता.[२] तिने सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनाचा स्टार स्क्रीन अवॉर्ड[१०] आणि आयफा पुरस्कार देखील जिंकला.[११] सोबत तिला स्टारडस्ट पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.[१२] ह्याचे संगीत अमित त्रिवेदीने दिले होते. कॉकटेल (२०१२) चित्रपटातील "तुम्ही हो बंधू" या गाण्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी व मिर्ची संगीत पुरस्कारसाठी नामांकन मिळाले होते.[१३]
२०२० मध्ये, कविताने बीबीसी टीव्ही मालिका ए सुटेबल बॉयला संगीत दिले होते, तसेच शोमध्ये तब्बूच्या पात्राच्या गाण्यांचेही गायन केले.[१४] २०२३ मध्ये, कविताने शर्मिला टागोर अभिनीत गुलमोहर चित्रपटात योगदान दिले. २०२३ मध्ये जुगजुग जीयो (२०२२) चित्रपटाच्या " रंगीसारी" गाण्यासाठी पुन्हा तिला फिल्मफेअर पुरस्कार[१५] मिळाला व झी सिने पुरस्कार.[१६][१७] तिने तिचा मुलगा कनिष्क सेठ सोबत या गाण्यासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.[१८]
<ref>
tag; नाव "st" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
<ref>
tag; नाव "it" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे