चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक ब्रम्हक्षत्रिय जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. यांती बहुतेकांना जोड आडनावे असतात, त्यांपीकी 'प्रभू' हे एक असते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे वेद आणि संस्कृत यांचा अभ्यास करतात. अनेक शतके या समुदायाची तलवार आणि लेखणी ही व्यवसायाची साधने आहेत. आजही भारतीय सैन्यामध्ये अनेक सीकेपी अधिकारी आढळतात. तसेच राजनैतिक क्षेत्रातही सीकेपी अग्रणी आहेत.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परंपरेने मटण, मासे, कोंबडी आणि अंडी खातात; त्यांच्या अन्नातील मुख्य पदार्थ पोळी (चपाती) आणि भात आहेत.
अनेक सीकेपी आडणावे दख्खन सल्तनत आणि मराठा साम्राज्याच्या काळातील आहेत. ते राज्यकर्त्यांनी कुटुंबाच्या संस्थापकाला दिलेली सरकारी पदवी दर्शवतात. उदाहरणार्थ, चिटणीस, पोतनीस, कारखानीस, देशमुख, देशपांडे, गडकरी, अधिकारी इ. [१]
मराठी मध्यमवर्गीयांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. संचालक मंडळातील काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या बँकेला वाचविण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात प्रयत्न सुरू होते. तथापि पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझव्र्ह बँकेने २०१० सालच्या एप्रिलमध्ये काढला होता, त्यात सुधारणा करून बँकेवरील निर्बंध ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने घेतला आहे.