डिकिन्सन थियोडोर रूझवेल्ट प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: DIK, आप्रविको: KDIK, एफ.ए.ए. स्थळसूचक: DIK) तथा डिकिन्सन म्युनिसिपल विमानतळ अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील डिकिन्सन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दक्षिणेस सहा मैलांवर स्टार्क काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ डिकिन्सन विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. [१]
हा विमानतळ पश्चिम नॉर्थ डकोटा, पूर्व मोंटाना आणि वायव्य साउथ डकोटा या प्रदेशांना विमानसेवा देतो. येथे फक्त एक विमानकंपनी, युनायटेड एक्स्प्रेस, डेन्व्हर ला सीआरजे-२०० विमानाने प्रवासी नेते-आणते. पूर्वी डेल्टा कनेक्शन मिनियापोलिस-सेंट पॉलला जात असे.[२]
या विमानतळाला अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्टचे नाव देण्यात आले आहे.
विमान कंपनी | गंतव्य स्थान | संदर्भ |
---|---|---|
युनायटेड एक्सप्रेस | डेन्व्हर | [३] |
युनायटेड एक्सप्रेस स्कायवेस्ट एरलाइन्सद्वारे सीआरजे-२०० विमाने वापरते.
विमान कंपनी | गंतव्य स्थान | संदर्भ |
---|---|---|
आन्कोर एर कार्गो बेमिद्जी एरलाइन्स द्वारे | फार्गो | [४] |
फेडेक्स फीडर कॉर्पोरेट एर द्वारे | फार्गो | [५] |