वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मदिनांक | १३ नोव्हेंबर, १९९४ |
जन्मस्थान | खोसा पांदो, पंजाब |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | गोळाफेक |
कामगिरी व किताब | |
ऑलिंपिक स्तर | २०२० उन्हाळी तोक्यो, जपान |
ताजिंदरपालसिंग तूर ( १३ नोव्हेंबर १९९४) हा भारतीय गोळाफेकपटू आहे. त्याने २१.४९ मीटर अंतरावर गोळा फेकून राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे.
ताजिंदरपालसिंग यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९९१रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील खोसा पांदो गावात झाला. शेतकरी कुटुंबातील ताजिंदरपालसिंग यांनी आपल्या वडिलांच्या आग्रहावरून क्रिकेट सोडून गोळाफेक या खेळाची निवड केली.[१]
२०१७ जूनमध्ये पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तूर यांनी २०.४० मीटर अंतरावर गोळा फेकून स्वतःची सर्वोत्तम कामगिरी केली. पण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची पात्रता २०.५० मीटर असल्यामुळे त्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली नाही.[२] त्यानंतरच्या महिन्यात, भुवनेश्वर येथे झालेल्या २०१७ च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी १९.७७ मीटरवर गोळा फेकला. या स्पर्धेत ०.०३ मीटर अंतराच्या फरकाने त्यांना रौप्यपदाकावर समाधान मानावे लागले.[३]
२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत १९.४२ मीटरवर गोळा फेकून तूर यांनी आठवे स्थान मिळवले.
२५ ऑगस्ट २०१८ रोजी २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २०.७५ मीटर अंतरावर गोळा फेकून तूर यांनी या स्पर्धेत विक्रम नोंदवला तसेच राष्ट्रीय विक्रम नोंदवला.[४]
२१ जून २०२१ रोजी भारतीय ग्रां प्री IV स्पर्धेत २१.४९ मीटरवर गोळाफेक करून तूर यांनी २०२० च्या तोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या गोळाफेकीने त्यांनी नवीन राष्ट्रीय तसेच आशियाई विक्रमसुद्धा केला.[५]