तादासुनो मोरी (जपानी: 糺 の 森), ज्याचा शब्दशः अर्थ "दुरुस्तीचे वन" असा आहे. हे एक पवित्र ग्रोव्ह आहे. ज्याला जपानमध्ये कामो-जिंजा म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वाचे शिंटो अभयारण्य मानले जाते. कमो नदीच्या उत्तर दिशेला हे वसलेले आहे. टाकानो नदी जपानच्या ईशान्य क्योतो शहरात कामो नदीला जोडते. जपानी भाषेत कमो-जिंजा हा शब्द शिमोगॅमो तीर्थ आणि कामिगोमो तीर्थ, सामान्यतः क्योतोच्या कमोटो मंदिराशी निगडीत आहे.[१] कमो-जिंजा हे क्योतोला दुःखी/ नकारात्मक प्रभावांपासून वाचविण्याचे कार्य करतात.[२]
अंदाजे १२.४ हेक्टर (३१ एकर) क्षेत्रामध्ये हे जंगल पसरलेले आहे, जे एक राष्ट्रीय ऐतिहासिक साइट (国 の 史跡) म्हणून संरक्षित आहेत. आज या जंगलाचे सर्वात शेवटचे अवशेष उरलेले आहेत. एकेकाळी हे जंगल कधीच भस्मसात न होणारे म्हणून ओळखले जात होते. शतकानुशतके जंगलाचे नुकसान झाले आहे. जेव्हा क्रांती आणि युद्धाच्या वेळी क्योतो जळून खाक झाले तेव्हा याचे देखील नुकसान झाले होते. परंतु या जंगलाची वाढ वारंवार होत गेली. सध्या हे वन नैसर्गिक स्थितीत वाढण्यास ठेवले आहे. त्याची लागवड किंवा छाटणी केली जात नाही.
प्राचीन काळातील जंगलात सुमारे हे ४९,५०,००० चौरस मीटर (४.९५ चौ. किमी) जागेवर पसरलेले वन होते. मध्ययुगीन काळात झालेल्या युद्धांमुळे आणि मीजी काळातील चौथ्या वर्षातील हुकूममुळे या जंगलाची जागा कमी झाली आणि ते सध्या सुमारे १२,००० चौरस मीटर (०.०१२ चौ. किमी) उरलेले आहे. [३]
तादासु-नो-मोरी या नावाने ओळखले जाणारे जंगल शिमोगॅमो मंदिरच्या जमिनीवर आहे. ही क्योतो व आसपासच्या सतरा ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. १९९४ मध्ये युनेस्कोने प्राचीन क्योतोची ऐतिहासिक वास्तू म्हणून यादीत समावेश केला होता.