भारतीय बास्केटबॉल खेळाडू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २१, इ.स. १९८२ वाराणसी | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
दिव्या सिंग (२१ जुलै, १९८२ - ) ही भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार आहे. २००६ च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत सिंग हीने भारतीय महिला बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले.
ती खेळण्याची कौशल्ये, नेतृत्वगुण, शैक्षणिक सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व यासाठी ओळखली जाते.[१] तिने २००८ ते २०१० मध्ये डेलावेर विद्यापीठ, न्यूर्क, डेलावेर (यूडी) येथे क्रीडा व्यवस्थापन केले.आणि यू डी मध्ये महिला बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले. तिने १६ वर्षांखालील भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले जे व्हिएतनाम २०११ मध्ये सहभागी झाले होते. गोव्यातील लुसफोनी गेम्समध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची ती सहायक प्रशिक्षक होती. १७ व्या एशियन गेम्स इनचान २०१४ मध्येही तिने भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाची सहायक प्रशिक्षक म्हणून काम केले होते.[२]
ती एमटीएनएल, दिल्ली येथे नोकरी करते. ती वाराणसी येथील आहे. तिच्या पाचपैकी चार बहिणी भारतीय राष्ट्रीय संघासाठी खेळतात.तिच्या बहिणी प्रशांती, आकांक्षा आणि प्रतिमा यांनी भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.[३] संघाचे सध्याची कर्णधार आकांषा सिंह आहे.आणखी एक बहीण प्रियंका सिंह एनआयएस बास्केटबॉलची प्रशिक्षक आहे. एकत्रितपणे ते सिंग सिस्टर्स म्हणूनही ओळखले जातात. त्यांना एक भाऊ आहे.त्याचे नाव विक्रांत सोलंकी आहे कि जो फुटबॉल खेळतो. त्याने उत्तर प्रदेश आणि ज्युनिअर आय-लीगमधून बरेच खेळ खेळले आहे.ततो श्री वेंकटेश्वर कॉलेज नवी दिल्ली येथे विद्यार्थी आहे.
सिंग अनेक ठिकाणी प्रशिक्षण म्हणून काम करते .दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि येशू आणि मेरी कॉलेज अशा अनेक महाविद्यालयांमधे प्रशिक्षक आहेत.[४]