नक्श लायलपुरी | |
---|---|
जन्म नाव | जसवंत राय शर्मा |
टोपणनाव | नक्श लायलपुरी |
जन्म |
२४ फेब्रुवारी १९२८ ल्यालपुर, (आता फैसलाबाद) पाकिस्तान |
मृत्यू |
२२ जानेवारी २०१७ अंधेरी, मुंबई, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, कवी |
अपत्ये | ३ |
जसवंत राय शर्मा तथा नक्श लायलपुरी (२४ फेब्रुवारी, इ.स. १९२८:फैसलाबाद, पाकिस्तान - २२ जानेवारी, इ.स. २०१७:अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय गझल आणि बॉलिवूड गीतकार होते.
शर्मांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२८ रोजी ल्यालपुर (आता फैसलाबाद, पाकिस्तान) मध्ये झाला.[१] त्यांचे वडील यांत्रिकी अभियंता होता आणि जसवंतनेही अभियंता व्हावे अशी त्यांची इच्छा होती. वयाच्या आठव्या वर्षी शर्मा यांच्या आईचा कांजिण्यामुळे मृत्यू झाला. १९४६ साली त्यांनी हिरो प्रकाशने नावाचा एका प्रकाशन गृहात काम केले आणि नंतर काम शोधत ते लाहोरला आले. भारताच्या फाळणी नंतर त्यान्चे कुटुंब लखनौ येथे स्थलांतरीत झाले. नंतर त्यानी "नक्श", (म्हणजे एक ठसा किंवा एक चिन्ह) असे टोपणनावाचा वापर सुरू केला व उर्दू कवी परंपरे प्रमाणे जन्मस्थानावरून पुढे "ल्यालपुरी" जोडले.[२]
१९५१ मध्ये ते मुंबईत आले आणि एक पुरावा वाचक म्हणून द टाइम्स ऑफ इंडियात काम सुरू केले. कमलेशशी लग्न करून त्यांना तीन पुत्र बप्पन, राजेंद्र आणि सुनीत आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यान्नी पण "ल्यालपुरी" हे आडनाव स्वीकारले.[३]
१९५० च्या दशकात ल्यालपुरी मुम्बईत आले. त्यानी नाटके लिहिली व त्याची ओळख दिग्दर्शक जग्दिश सेठीशी झाली. १९५३ मधे त्यानी सेठीच्या जग्गू चित्रपटात "अगर तेरी आन्खोसे आन्खे मिला दू" हे गीत लिहिले जे हन्सराज बहल ने सगीतबद्ध केले व आशा भोसले ने गायले होते. १९५३ मधे त्यानी सगीतकार सपन-जगमोहन साठी पजाबी चित्रपट जिजाजी मधे गीत लिहिले. १९७० च्या दशकापरियन्त त्याना यश नाही मिळाले.
गीत लिहिलेली चित्रपट:
ल्यालपुरी यांचे २२ जानेवारी २०१७ला अंधेरी, मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८८ वयाचे होते.[११]