निकिता सिंह (६ ऑक्टोबर, १९९१:पटणा, बिहार, भारत - ) एक भारतीय लेखिका आहेत.[१] त्यांनी द रिझन इज यू, एव्हरी टाईम इट रेनस, लाइक अ लव सॉन्ग, द प्रॉमिस अँड ऑटर इन ऑल टाइम यांसह बारा पुस्तके लिहिली आहेत. तिची २०१६ची कादंबरी, लाइक ए लव सॉन्ग, हिंदुस्तान टाईम्सच्या बेस्टसेलरच्या यादीमध्ये क्रमांक २ वर पदार्पण केली. पुढच्या वर्षी, एव्हरी टाइम इट रेन्सने याच यादीवर ७ व्या क्रमांकावर पदार्पण केले.[२]
सिंग यांचा जन्म बिहारच्या पाटणा येथे झाला. त्यांने २००८ मध्ये रांचीच्या ब्रिजफोर्ड स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. इंदूरमधील अॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये त्यांनी फार्मसीमध्ये पदवी संपादन केली
सप्टेंबर २०११ मध्ये, एक्सिडेंटली इन लव्ह..विथ हिम? अगेन? प्रकाशित केले . त्यानंतर इफ इट इज नॉट फॉरव्हर इट्स नॉट लव्ह, प्रकाशित झाले.[३]