बौद्ध तीर्थस्थळे |
---|
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
नंतरची स्थळे |
|
भरहुत (भरहट) भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, जे तिथल्या बौद्ध स्तूप आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘भरहुत स्तूप’ सम्राट अशोकांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात निर्माण केला असावा, पण सुंग राजवटीदरम्यान अनेक शोभेच्छा पट्ट्या वापरून या स्तूपामध्ये कलाकुसरीच्या अनेक कामांची भर घातलेली आहे. कनिंघम यांनी इ.स. १८७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला.
भरहुतमधील स्तूपाचे एक वैशिष्ट्य असे की, तेथील भिंतींवर किंवा दाराच्या लाकडी, अरूंद चौकटींवर काही मजकूर कोरलेला आहे, ज्यात अधिकतर काही व्यक्तींची ओळख दिलेली आहे. या स्तूपातील पुराणसंशोधनातल्या सर्व वस्तू आता कोलकात्याच्या वस्तुसंग्रहालयात नेऊन ठेवलेल्या आहेत.