मार्गुन ब्योर्नहॉल्ट | |
जन्म | ९ ऑक्टोबर १९५८ बो टेलीमार्क, नॉर्वे |
कार्यक्षेत्र | समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | नॉर्वेजियन सेंटर फॉर व्हायलेन्स अँड ट्रामॅटिक स्ट्रेस स्टडीज, ओस्लो विद्यापीठ, बेर्गन विद्यापीठ |
मार्गुन ब्योर्नहॉल्ट हिचा जन्म ९ ऑक्टोबर १९५८ रोजी बो टेलीमार्क येथे झाला. ती एक नॉर्वेजियन समाजशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आहे. ती नॉर्वेजियन सेंटर फॉर व्हायलेन्स अँड ट्रामॅटिक स्ट्रेस स्टडीज मध्ये संशोधन प्राध्यापक आणि बर्गन विद्यापीठात समाजशास्त्राची प्राध्यापिका आहे.[१][२]
तिचे संशोधन लिंग-आधारित हिंसा, स्थलांतरित आणि निर्वासित, लैंगिक समानता, पुरुष आणि पुरुषत्व, धोरण अभ्यास आणि इतर अनेक विषयांवर केंद्रित आहे. तिचे सर्वात अलीकडील संशोधन लिंग, हिंसा आणि शक्तीशी संबंधित प्रश्नावर भर देते. ज्यात महिला स्थलांतरित आणि निर्वासितांवरील होणारी लैंगिक आणि लिंग-आधारित हिंसा आणि स्थानिक सामी समुदायांमधील हिंसाचार यांचा समावेश आहे. तिचे पूर्वीचे संशोधन नैतिक बँकिंग, पैसा, चलन प्रणाली, व्यवस्थापन आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थात्मक बदल यावर केंद्रित होते .
तिने सल्लागार, नागरी सेवक म्हणूनही काम केले आहे. युरोपियन कमिशनमध्ये तज्ञ म्हणून काम केले आहे. ती महिलांच्या हक्कांसाठी असलेल्या संस्थेत नॉर्वेजियन असोसिएशनची अध्यक्षा होती.
तिने अर्थशास्त्र, प्रादेशिक नियोजन, राजकारण आणि समकालीन इतिहासाचा अभ्यास केला. तिच्याकडे कॅंड.मॅग, ट्रोम्सो विद्यापीठातून पदवी (१९८१), कॉलेज ऑफ युरोप (१९८२) मधून युरोपियन आर्थिक अभ्यासात एमए, मॅग.आर्ट (पीएचडी), ओस्लो विद्यापीठातून आर्थिक समाजशास्त्रात (१९९५), मायक्रोफायनान्स, नैतिक आणि व्याजमुक्त बँकिंग या विषयावर प्रबंध आणि ओरेब्रो विद्यापीठातून (२०१४) मॉडर्न मेन या प्रबंधासह पुरुषांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात पीएचडी अशा बऱ्याच पदव्या आहेत. मानसशास्त्रज्ञ मार्गोट बेंगट्सन यांनी प्रभावी आणि महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आंतरजनरेशनल ट्रान्समिशन आणि सामाजिक बदल यावर सामाजिक मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. तिला २०१५ मध्ये पूर्ण प्राध्यापकी पात्रता प्रदान करण्यात आली.[२][३][४]