Indian composer (1926-2012) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ३, इ.स. १९२६ दिल्ली | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ७, इ.स. २०१२ मुंबई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
रविशंकर शर्मा (जन्म : ३ मार्च, १९२६ दिल्ली ; - ७ मार्च, २०१२), हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते. ते मूळचे दिल्लीचे. लहानपणी हातात येईल ती वस्तू घेऊन ते ताल धरत. कलेच्या ओढीने ते १९५० साली मुंबईत दाखल झाले. रस्त्यावर रहात आणि मालाड रेल्वे स्टेशनवर झोपत. मुंबईतील अनेक चित्रपट स्टुडिओंचे हेलपाटे घालून घालून निराश झाल्यावर, शेवटी त्यांना हेमंत कुमार या संगीत दिग्दर्शकांनी उमेदवारी देऊ केली. सुरुवातीला हेमंतकुमार यांनी त्यांना ’आनंदमठ’मध्ये वंदे मातरम या गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी दिली. नंतर रवि, हे हेमंतकुमार यांचे साहाय्यक बनले. साहाय्यक संगीतकार म्हणून काम केलेल्या चित्रपटांपैकी नागिन हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट. उमेदवारी दरम्यान रवीने, देवेंद्र गोयल याने बनवलेल्या वचन या हिंदी चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांच्या ’वचन’ ने संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात सतत २५ आठवडे चालू राहण्याचा पराक्रम केला. त्यानंतर हेमंत कुमारांनी रवीला उमेदवारीतून मुक्त केले.
गीतांना दिलेल्या साध्या, सोप्या, सरळ चाली हे संगीतकार रवींचे वैशिष्ट्य होते. ते स्वतः उत्तम कवी आणि गायकही होते. आधी चाल आणि मग काव्यरचना हा प्रकार त्यांना पटत नसे.
वैयक्तिक आयुष्य :
संगीतकार रवी १९४६मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांची पत्नी १९८६मध्ये निर्वतली. त्यांच्यापासून दुरावलेल्या [१] त्यांच्या मुलाने मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरशी लग्न केले आहे.
रवि यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेले चित्रपट :
रवी यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली गाणी * मिली ख़ाक मे मुहब्बत * चौदहवीं का चॉंद हो (दोन्ही एकाच चित्रपटातील) * नसीब में जो लिखा था * रहा गर्दिशोंमें हरदम * भरी दुनियॉंमें हरदम (तिन्ही दो बदन मधली) *