राष्ट्रीय महामार्ग ५४८बी | |
---|---|
लांबी | ५७२.९ किमी |
सुरुवात | मंठा |
मुख्य शहरे | अंबाजोगाई - लातूर - उमरगा - अक्कलकोट - विजयपूर |
शेवट | संकेश्वर-गोतूर |
राज्ये |
महाराष्ट्र: ४०४.०२ किमी कर्नाटक: १६८.९० किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ५४८बी[१] हा भारतातील राष्ट्रीय महामार्ग ४८चा सहाय्यक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग मंठा (जालना जिल्हा) येथे सुरू होतो आणि संकेश्वर-गोतूर(कर्नाटक) येथे संपतो.
हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून जातो. हा राष्ट्रीय महामार्ग ५७२.९ किमी अंतराचा आहे.
अंबाजोगाई, लातूर, उमरगा, अक्कलकोट आणि विजयपूर ही या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाची शहरे आहेत.
मंठा पासून विजयपूर, गोतूर कडे प्रवास करताना अनुक्रमे खालील ठिकाणे लागतात. राज्यातील या राष्ट्रीय महामार्गाची लांबी कंसात दर्शविली आहे[१].
महाराष्ट्र (४०४.०२ किमी)
कर्नाटक (१६८.९० किमी)