वृंदा करात | |
मतदारसंघ | पश्चिम बंगाल |
---|---|
वृंदा करात (जन्म १७ ऑक्टोबर १९४७)[१][२] या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या ११ एप्रिल २००५ रोजी पश्चिम बंगालसाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.
इ.स. २००५ मध्ये, त्या सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या. १९९३ ते २००४ या काळात त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या (एआयडीड्ब्ल्युए) सरचिटणीस होत्या.[३] आणि त्यानंतर उपाध्यक्ष होत्या.
त्यांनी ७ नोव्हेंबर १९७५ मध्ये प्रकाश करात यांच्याशी विवाह केला. ते मूळचे केरळी आणि एका प्रमुख सीपीआय(एम) नेता होते.[४][५] त्यांची बहीण राधिका रॉय हिचे लग्न एनडीटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्याशी झाले आहे.[६] इ.स. २००५ मध्ये, त्यांनी अमू[७] चित्रपटामध्ये काम केले. जो १९८४ मधील शीख विरोधी दंगलीवर त्यांच्या भाचीने, शोनाली बोस, बनवला होता. त्या इतिहासकार विजय प्रसाद यांच्या काकू आहेत.
वृंदा या सर्वायवल अँड इमॅन्सीपेशन: नोट्स फ्रॉम इंडियन वुमन्स स्ट्रगल्सच्या लेखिका आहेत, हे काम भारतातील महिला चळवळींना भेडसावणाऱ्या आव्हानांना डाव्या दृष्टिकोनातून संबोधित करते. [३]