वेंकटेश (अभिनेता)

दग्गुबाती वेंकटेश
दग्गुबाती वेंकटेश
जन्म वेंकटेश रामानायडू दग्गुबाती
१३ डिसेंबर, १९६० (1960-12-13) (वय: ६४)
करमचेडू, आंध्रप्रदेश
इतर नावे डी वेंकटेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ १९८६ ते आजपर्यंत
भाषा तेलुगू
वडील डी रामानायडू
पत्नी
नीरजा दग्गुबाती (ल. १९८५)
अपत्ये
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

दग्गुबाती वेंकटेश हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो मुख्यतः तेलुगु सिनेमा आणि हिंदी चित्रपटात काम करतो. इ.स. १९८६ मध्ये तेलुगू चित्रपट कलियुगु पंदवूलु मधून वेंकटेशच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.

सुप्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माता डी रामानायडूचा तो मुलगा आहे. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत वेंकटेश ने जवळपास बहात्तर चित्रपटात काम केले. वेंकटेशला सात राज्य नंदी पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले.[][]

वेंकटेश ने त्याचा भाऊ दग्गुबाती सुरेश बाबू सोबत मिळून भारतातील मोठ्या चित्रपट निर्मिती कंपनीपैकी एक असलेली वेंकटेश सुरेश प्रॉडक्शन नावाची कंपनी स्थापना केली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Victory Venkatesh completes 34 years in Tollywood - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Venkatesh Daggubati Awards: List of awards and nominations received by Venkatesh Daggubati | Times of India Entertainment". timesofindia.indiatimes.com. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "SURESH PRODUCTIONS PVT.LTD. - Company, directors and contact details | Zauba Corp". www.zaubacorp.com. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.