शरद पोंक्षे

शरद पोंक्षे
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख नाटके मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या तिघांची गोष्ट, हिमालयाची सावली
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम वादळवाट, वहिनीसाहेब, असे हे कन्यादान, अग्निहोत्र, दार उघड बये, ठिपक्यांची रांगोळी, कुंकू, जय मल्हार, उंच माझा झोका, दुर्वा

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

जीवन

[संपादन]

शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मिरज येथे आजोळी झाले []. त्यानंतर त्यांयाचे कुटुंब मुंबईत हलल्यावर, भायंदर येथील अभिनव विद्या मंदिर येथील शाळेत त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले []. इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर ते बेस्टमध्ये नोकरीत रुजू झाले.

कारकीर्द

[संपादन]

इ.स. १९८८ साली दे टाळी या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले []. इ.स. १९८९ साली वरून सगळे सारखे या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला.

शरद पोंक्षे यांच्‍या नाट्य कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै १९९८ रोजी झाला []. या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. २००० साली बेस्टमधील नोकरी सोडली. []

मी नथुराम गोडसे बोलतोय

[संपादन]

प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माऊली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथुरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६ मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे.

आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.

नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात.

व्याख्याने

[संपादन]

शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाल्याचे समजून आल्यावर त्यांवी अभिनय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. कॅन्सरच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, त्या रोगातून बाहेर पडल्यावर शरद पोंक्षे फक्त व्याख्याने देतात. सावरकर हा त्यांच्या अनेक व्याख्यानांचा विषय असतो. २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी फर्ग्युसन काॅलेजमधील 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभात भाषण केले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यान बंद पाडायचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. पण बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पोलीस बंदोबस्तात ते भाषण झाले.

२६ डिसेंबर २०१९ रोजी निगडी प्राधिकरणात 'आम्ही सर्व सावरकर' या कार्यक्रमात 'सावरकर विचारदर्शन' या विषयावर भाषण झाले. २२ जानेवारी २०२० रोजी पोंक्षे यांचे पुण्यात धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रभक्त सावरकर’ या विषयावर व्याख्यान झाले. ०२ मार्च २०२० रोजी पोंक्षे यांनी याच विषयावर कोल्हापुरात व्याख्यान दिले.

पिंपरी-पुणे येथील समर्थ प्रॉडक्शन आणि मातृमंदिर या संस्थांनी १० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केलेल्या स्वरगंधर्व संगीत महोत्सवामध्ये शरद पोंक्षे यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या विषयावर व्याख्यान दिले.

नाटक

[संपादन]
  • अथांग
  • असं झालंच कसं?
  • उंबरठा
  • एक दिवस मठाकडे
  • एका क्षणात
  • कबिराचे काय करायचे?
  • कळा या लागल्या जीवा
  • गंध निशिगंधाचा
  • गांधी आंबेडकर
  • तिची कहाणी
  • तू फक्त हो म्हण
  • झाले मोकळे आकाश
  • त्या तिघांची गोष्ट
  • नटसम्राट
  • नांदी
  • बॅरिस्टर
  • बायकोचा खून कसा करावा?
  • बेइमान
  • भारतभाग्य विधाता
  • मी नथुराम गोडसे बोलतोय
  • रमले मी
  • लहानपण देगा देवा
  • वर भेटू नका
  • वरून सगळे सारखे
  • सुखाने नांदा
  • सर्वस्वी तुझीच
  • हे राम नथुराम

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]

शरद पोंक्षे यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अग्निहोत्र, वादळवाट, कुंकू, असे हे कन्यादान, उंच माझा झोका या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय केले. न्यायमूर्ती रानडे व त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित मालिकेत शरद पोंक्षे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांची भूमिका रंगवली. याशिवाय कै. विनय आपटे यांच्या देहावसानानंतर दुर्वा या मालिकेत त्यांची भूमिका शरद पोंक्षे यांनी अतिशय ताकदीने रंगवली.

दूरचित्रवाहिनी-अभिनयाची कारकीर्द

[संपादन]
वर्ष (इ.स.) दूरचित्रवाहिनी कार्यक्रम दूरचित्रवाहिनी भाषा सहभाग/टिप्पणी
२००८-२००९ अग्निहोत्र स्टार प्रवाह मराठी अभिनय (भूमिका -"महादेव अग्निहोत्री")
२०१२-२०१३ उंच माझा झोका झी मराठी मराठी अभिनय (भूमिका -"गोविंदराव रानडे")
२०१५ असे हे कन्यादान झी मराठी मराठी अभिनय (भूमिका -"सदाशिव कीर्तने")
आभाळमाया झी मराठी मराठी अभिनय
२००९-२०१२ कुंकू झी मराठी मराठी अभिनय
२०१४-२०१७ जय मल्हार झी मराठी मराठी अभिनय (भूमिका -"अजामेळ")
दामिनी दूरदर्शन सह्याद्री मराठी अभिनय (भूमिका -"उदय कारखानीस")
दुर्वा स्टार प्रवाह मराठी अभिनय
२००३-२००७ वादळवाट झी मराठी मराठी अभिनय (भूमिका -"देवराम खंडागळे")
२००६-२००९ वहिनीसाहेब झी मराठी मराठी अभिनय (भूमिका - "धर्मा")
२०१९-२०२० अग्निहोत्र २ स्टार प्रवाह मराठी अभिनय (भूमिका -"महादेव अग्निहोत्री")
२०२०-२०२१ आई माझी काळुबाई सोनी मराठी मराठी अभिनय
२०२१- चालू ठिपक्यांची रांगोळी स्टार प्रवाह मराठी अभिनय (भूमिका -"विनायक कानिटकर")
२०२२- चालू दार उघड बये झी मराठी मराठी अभिनय (भूमिका - "रावसाहेब नगरकर")

चित्रपट-कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट भाषा
२०१७ कनिका मराठी
२०१६ विघ्नहर्ता महागणपती मराठी
२०१६ वेल डन भाल्या मराठी
२०१६ वृंदावन [] मराठी
२०१५ ब्लॉक मराठी
२०१५ व्हॉट अबाऊट सावरकर [] मराठी
२०१५ संदूक मराठी
२०१४ तप्तपदी मराठी
२०१२ तुकाराम मराठी
२०१३ कुरुक्षेत्र मराठी
२०१३ मोकळा श्वास [] मराठी
२०१३ अशाच एका बेटावर [] मराठी
२०१४ सुराज्य मराठी
२०१३ अंगारकी मराठी
२०१२ हाय कमांड [] मराठी
२०१२ जरा जपून करा मराठी
२०१२ सत्या मराठी
२०१३ जय शंकर मराठी
२०१३ जय महाराष्ट्र मराठी
२०१३ धर्मांतर मराठी
२०१३ स्वराज्य मराठी
२०१३ कुरुक्षेत्र मराठी
२०१३ सुराज्य मराठी
२०१२ फक्त सातवी पास मराठी
२०१२ गोळा बेरीज मराठी
२०१२ उदय मराठी
२०१२ बोकड मराठी
२०१२ सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं मराठी
२०११ तूच घरची लक्ष्मी मराठी
२०११ हिप हिप हुर्रे मराठी
२०११ आरंभ मराठी
२०१० साई दर्शन.....एक अनुभव मराठी
२०१० जेता मराठी
२०१० मिशन पॉसिबल [] मराठी
२०१० पाश मराठी
२०१० मुलगा मराठी
२०१० कोण आहे रे तिकडे मराठी
२०१० क्रांतिवीर राजगुरू मराठी
२०१० झाले मोकळे आकाश मराठी
२००८ अचानक मराठी
२००८ धुडगूस मराठी
२००८ होतं असं कधी कधी मराठी
२००७ बंध प्रेमाचे मराठी
२००७ वासुदेव बळवंत फडके मराठी
२००६ रास्ता रोको मराठी
२००६ गाढवाचं लग्न मराठी
१९८८ फेरा मराठी
२००५ एक पल का प्यार हिंदी
२००० हे राम हिंदी
१९८८ दे टाळी मराठी

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ". 2013-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शरद पोंक्षे चे पान (इंग्लिश मजकूर)
  1. ^ गिरमे,सागर. "अभिनेता होण्याची लहानपणापासूनची इच्छा..." 2011-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d शिर्के,उल्हास. "प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान". 2013-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ http://marathistars.com/movies/vrundavan-2016-marathi-movie/
  4. ^ http://marathistars.com/movies/what-about-savarkar-marathi-movie/
  5. ^ http://marathistars.com/movies/mokala-shwaas-marathi-movie-cast-story-photos/
  6. ^ https://in.bookmyshow.com/movies/ashach-eka-betavar/ET00013071
  7. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-15 रोजी पाहिले.
  8. ^ http://marathimovieworld.com/review/mission-possible-review.php