शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदे
शिल्पा शिंदे ITA 2018
जन्म २८ ऑगस्ट, १९७७ (1977-08-28) (वय: ४७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९९ पासून आजपर्यंत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम भाभीजी घर पर है
टिपा
शिल्पा बिग बॉस ११ ची विजेता

शिल्पा शिंदे ( २८ ऑगस्ट १९७७) ही हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे. सुरुवातील तिने विविध मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या. 'भाभीजी घर पर है!' या मालिकेतील तीची 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने ती सर्वाधिक ओळखली जाते. शिल्पा बिग बॉस ११ची विजेता ठरली आहे.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

शिंदेचा जन्म २८ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय दलित कुटुंबात झाला. शिंदेचे वडील उच्चन्यायालयात न्यायाधीश होते. शिंदेला लहानपणीपासून डान्सची खूप आवड होती.

चार बहिण-भावांमध्ये शिल्पा तिसरी मुलगी आहे. तिच्या तिन्ही भावा-बहिणींचं लग्न झालं आहे.

शिंदे रोमित राज सोबत बरेच दिवस संबंध ठेवून होती पण ते सध्या वेगवेगळे राहतात.

शिक्षण व कारकीर्द

[संपादन]

शिंदेचे शिक्षण मुंबईत झालेले असून तिने मानसशास्त्रात पदवी घेतली आहे. शिंदेने तिची कारकीर्द १९९९ मध्ये सुरू केली. सुरुवातीला तिने दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला. भाभी, मायका, संजीवनी, चिडीया घर, हातीम, आम्रपाली आणि मिस इंडिया या मालिकांमध्येही काम केले आहे.

शिंदेने दोन तेलगू चित्रपटांत काम केले आहे. यामध्ये दासरी नारायण राव यांचा छिना आणि सुरेश वर्मा यांच्या शिवानी या सिनेमांचा समावेश आहे. शिल्पा शिंदेने १९९९ मध्ये नकारात्मक भूमिकेने अभिनयाची सुरुवात केली होती. २०१७ मध्ये शिल्पाने पटेलचा पंजाबी सिनेमा शादी मध्ये एक आयटम साँग सुद्धा केले आहे.

बिग बॉस ११ची विजेता

[संपादन]

१४ जानेवारी २०१८ रोजी शिंदेला ४७ टक्के मते मिळून ती बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनालेची विजेती ठरली आहे.[] घरात हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा हे चार शेवटचे स्पर्धक उरले होते. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत शिंदेला हिना खानने मोठे आव्हान दिले होते. बिग बॉसमध्ये जिंकल्यामुळे शिंदेच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

संदर्भ

[संपादन]