सरिता गायकवाड (जन्म १ जून १९९४) एक भारतीय धावपटू आहे [१]. २०१८ च्या "आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला" ४ × ४०० मीटर रिले संघाची एक भाग होती[२].
सरिताचा जन्म १ जून १९९४ रोजी गुजरातच्या डांग जिल्ह्यातील खराडी अंबा गावात आदिवासी कुटुंबात झाला होता. २०१० पर्यंत तिने राष्ट्रीय स्तरीय खो खो स्पर्धेत आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. सध्या ती आयकर अधिकारी म्हणून काम करते[३].
ऑस्ट्रेलियामध्ये २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिलांच्या ४ × ४०० मीटर रिले संघात तिची निवड झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेली ती राज्यातील पहिली ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट ठरली[४].