सीमा देव | |
---|---|
जन्म |
सीमा देव २७ मार्च १९४२ |
मृत्यू | २४ ऑगस्ट, २०२३ (वय ८१) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ[१], (२७ मार्च, १९४२; मुंबई, महाराष्ट्र - २४ ऑगस्ट, २०२३) या एक मराठी अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.
इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.
२४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी उतार वयामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते.[२] मृत्यू पूर्वी त्या अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या.[३]
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |