सुंदरलाल बहुगुणा

सुंदरलाल बहुगुणा (bho); সুন্দরলাল বহুগুণা (bn); Sunderlal Bahuguna (fr); Sunderlal Bahuguna (ast); Sunderlal Bahuguna (ca); सुंदरलाल बहुगुणा (mr); Sunderlal Bahuguna (de); ସୁନ୍ଦରଲାଲ ବହୁଗୁଣା (or); Sunderlal Bahuguna (ga); ساندرلال باهوگونا (fa); Sunderlal Bahuguna (en-gb); సుందర్ లాల్ బహుగుణ (te); Sunderlal Bahuguna (sl); サンデルラール・バーフガナ (ja); Sunderlal Bahuguna (sq); Sunderlal Bahuguna (en); Sunderlal Bahuguna (id); Sunderlal Bahuguna (sw); സുന്ദർലാൽ ബഹുഗുണ (ml); Sunderlal Bahuguna (nl); सुन्दरलाल बहुगुणा (sa); सुन्दरलाल बहुगुणा (hi); ಸುಂದರ್ಲಾಲ್ ಬಹುಗುಣ (kn); ਸੁੰਦਰਲਾਲ ਬਹੁਗੁਣਾ (pa); সুন্দৰলাল বহুগুণা (as); 순데랄 바후구나 (ko); Sunderlal Bahuguna (es); சுந்தர்லால் பகுகுணா (ta) ভারতীয় সক্রিয় কর্মী (bn); militant militant écologiste de l’Uttarakhandécologiste de l’Uttarakhand (fr); environmental activist from Uttarakhand, India (1927-2021) (en); Indian Environmental activist (en-gb); gníomhaí Indiach (ga); ಭಾರತೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ (kn); Indian Environmental activist (en-ca); Mwanaharakati wa mazingira kutoka Uttarakhand (sw); ഉത്തരഖണ്ഡിലെ പരിസ്ഥിതിപ്രവർത്തകൻ. ചിപ്കോ പ്രസ്ഥാനം ആരംഭിച്ചു. (ml); Indiaas milieuactivist (nl); environmental activist from Uttarakhand, India (1927-2021) (en); भारतीय कार्यकर्ता (hi); భారతీయ కార్యకర్త, గాంధేయవాది, ఉద్యమకారుడు, పర్యావరణవేత్త. అతను చిప్కో ఉద్యమానికి నాయకత్వం వహించాడు. (te); ਉੱਤਰਾਖੰਡ, ਭਾਰਤ ਤੋਂ ਵਾਤਾਵਰਨ ਕਾਰਕੁੰਨ (1927-2021) (pa); ভাৰতীয় পৰিৱেশকৰ্মী (as); ناشط هندي (ar); 인도의 환경운동가 (1927–2021) (ko); காந்தியவாதி (ta) Sunderlal Bahuguna (ml)
सुंदरलाल बहुगुणा 
environmental activist from Uttarakhand, India (1927-2021)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी ९, इ.स. १९२७
नवे तेहरी
मृत्यू तारीखमे २१, इ.स. २०२१
ऋषिकेश
नागरिकत्व
व्यवसाय
  • environmentalist
  • political activist
पुरस्कार
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुंदरलाल बहुगुणा (९ जानेवारी, १९२७ - २१ मे, २०२१[]) हे भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते होते. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांच्या पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांना सुचली. त्यांनी हिमालयातील जंगलांच्या रक्षणासाठी लढा दिला, प्रथम 1970 च्या दशकात चिपको चळवळीचा सदस्य म्हणून, आणि नंतर 1980 पासून ते 2004 च्या सुरुवातीपर्यंत टिहरी धरणविरोधी चळवळीचे नेतृत्व केले.[] ते भारतातील सुरुवातीच्या पर्यावरणवाद्यांपैकी एक होते,[] आणि नंतर त्यांनी आणि इतरांनी चिपको चळवळीशी निगडित केले आणि मोठ्या धरणांना विरोध करण्यासारखे व्यापक पर्यावरणीय मुद्दे उचलण्यास सुरुवात केली.[]

सुंदरलाल बहुगुणा टेहरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना

चिपको आंदोलन

[संपादन]

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती. त्या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.

टेहरीसाठी उपोषण

[संपादन]

टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.

भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sunderlal Bahuguna: चिपको आंदोलनाचे प्रणेते, 'पद्म'विजेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन". Maharashtra Times. 2021-05-21 रोजी पाहिले.
  2. ^ Bahuguna, the sentinel of Himalayas by Harihar Swarup, The Tribune, 8 July 2007.
  3. ^ Sunderlal Bahuguna, a pioneer of India's environmental movement... The New York Times, 12 April 1992.
  4. ^ "Remembering Sundarlal Bahuguna Ji: A Freedom Fighter Who Took the Chipko Movement to the World". 22 May 2021.