female representation in Indian iconography | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
| |||
![]() |
सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरी हे शिल्प भारतातील अनेक मंदिरांच्या कोरीव[१]कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे.[२] त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील त्याची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. [३] "क्षीरार्णव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे. [४]
सुरसुंदरीना देण्यात आलेली नावे ही त्या काय कृती करीत आहेत यावरून पडलेली आहेत. ती अशी:
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. काही शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेहऱ्यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक रेखांकन या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजूला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने (?) देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. [५]
मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.[६]
मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.
खजुराहो तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.[७]
तरुण युवतींना चेंडू खेळायला आवडतो असा संदर्भ बाणभट्ट या संस्कृत लेखकाने नोंदविलेला आहे. दंडी या संस्कृत लेखकानेही एका राजकन्येला चेंडू खेळण्याची आवड असल्याचे नोंदविले आहे. शिल्पातील सुंदरी असा चेंडू खेळण्यात मग्न असण्याचे तपशील शिल्पातून दिसून येतात.[११]
काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्तीवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.[३]