वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्मदिनांक | [१] |
खेळ | |
खेळ | नेमबाजी |
कामगिरी व किताब | |
ऑलिंपिक स्तर | २०२४ उन्हाळी ऑलिंपिक - कांस्यपदक - ५० मी थ्री पोझिशन्स |
स्वप्नील कुसळे (६ ऑगस्ट, १९९५:कांबळवाडी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. [२]
कुसळेचा जन्म ६ ऑगस्ट १९९५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावात झाला. २००९मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी क्रीडा कार्यक्रमात दाखल केले. एक वर्षाच्या कठोर शारीरिक प्रशिक्षणानंतर, कुसळेने नेमबाजी मध्ये पुढील प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. [३] २०१५मध्ये त्याने पुण्यात भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस हे पद स्वीकारले. यातील कमाईतून त्याने आपली पहिली रायफल खरेदी केली. [४]
2024 ऑलिम्पिकमध्ये, कुसळे पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरलाय [५] अंतिम फेरीत ४५१.४ गुणांसह त्याने कांस्यपदक जिंकले. [२]
<ref>
tag; नाव "bronze" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे