अँड्रेयास फ्लॉकन (जन्म ६ फेब्रुवारी १८४५ रोजी अल्बर्सवैलर, राईनप्फाल्झ येथे झाला;२९ एप्रिल १९१३ रोजी कोबर्ग येथे त्यांचा मृत्यू झाला) एक जर्मन उद्योजक व संशोधक होते .
१८६८ पर्यंत फ्लॉकन मॅनहाइम मधील जर्मन कंपनी हाइनरिक लांझ ए जी मध्ये काम करत होते. मग त्यांने झुलेनरोडा येथे शॉपर्स कंपनीत काम केले.१८७९ पासून, फ्लॉकन आणि त्याचे कुटुंब कोबर्गमध्ये राहत होते. १८८० मध्ये, फ्लॉकनने कोबर्गमध्ये स्वतःची कंपनी सुरू केली.जर्मन संशोधक अँड्रेयास फ्लॉकनने तयार केलेली फ्लॉकन एलेक्ट्रोवागन जगातील प्रथम अस्सल विद्युत कार म्हणून ओळखली जाते .[१]