अंडरवॉटर आइस हॉकी हा बर्फाच्या खाली खेळला जाणारा खेळ आहे. यात स्पर्धक थिजलेल्या तलावाखाली बुड्या मारून बर्फाच्या खाली असलेल्या पाण्यापेक्षा हलक्या पकला गोलमध्ये ढकलायला बघतात. अतिथंड पाण्यात खेळला जाणाऱ्या खेळासाठी वेटसूट[मराठी शब्द सुचवा], पायपंख आणि डायव्हिंग मास्क[मराठी शब्द सुचवा] वापरले जातात. पाण्याखाली श्वास घेण्यासाठीचे उपकरण यात वापरले जात नाही.