अनुष्टुप छंद

अनुष्टुप छंद हा एक वार्णिक छंद आहे. संस्कृत साहित्यात याचा उपयोग सहसा आढळतो. श्रीमद्भग्वद्गीता, श्रीसूक्त, गायत्री कवच, विष्णु सहस्रनाम, इ. रचना या छंदात बद्ध आहेत. वाल्मिकींनी आपल्या कायाकल्पानंतर उच्चारलेले पहिले वाक्य अनुष्टुप छंदात असल्याची आख्यायिका आहे.