अन्ना राजम मल्होत्रा | |
---|---|
जन्म |
अन्ना जॉर्ज १७ जुलै १९२७ केरळ, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
१७ सप्टेंबर २०१८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | भारतीय प्रशासकीय सेवा |
मालक | भारत सरकार |
ख्याती | भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी |
जोडीदार | आर.एन. मल्होत्रा |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार (१९८९) |
अन्ना राजम जॉर्ज-मल्होत्रा (१७ जुलै, १९२७ - १७ सप्टेंबर, २०१८) या भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी होत्या.[१] मल्होत्रा या भारतीय प्रशासकीय सेवेतील १९५१ च्या बॅचमधील होत्या आणि त्यांचे बॅचमेट आर.एन. मल्होत्रा यांच्याशी त्यांनी लग्न केले होते.[२][३]
मल्होत्रा यांनी सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले होते. तसेच एशियाड प्रकल्पात राजीव गांधींसोबत काम केले, त्याबरोबरच इंदिरा गांधींसोबतही काही काळ काम केले.[४]
मल्होत्रा या मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (न्हावाशेवा) हे भारतातील पहिले संगणकीकृत बंदर बांधण्यासाठी ओळखल्या जातात. तसेच केंद्र सरकारमध्ये सचिव पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या मल्याळी महिला होत्या.
भारत सरकारने १९८९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.[५] मल्होत्रा यांचे सप्टेंबर २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.[२][६]