Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २०, इ.स. १९५६ भोपाळ | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अन्नू कपूर (२० फेब्रुवारी १९५६, जन्म नाव अनिल कपूर) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि दूरचित्रवाणीचा प्रस्तुतकर्ता आहे. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरिल अंताक्षरी या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता व अनेक चित्रपट जसे की मिस्टर इंडिया (१९८७), विकी डोनर (२०१२) आणि जॉली एलएलबी २ (२०१७) साठी ते प्रसिद्ध आहेत. विकी डोनर चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर पुरस्कार, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.[१][२][३]
अन्नू कपूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ मधील इटवारा येथे २० फेब्रुवारी १९५६ रोजी झाला. त्यांची आई कमल बंगाली आहे आणि वडिल मदनलाल हे पंजाबी आहे. त्यांच्या वडिलांची शहर आणि गावात काम करणारी एक पारशी नाट्य कंपनी होती. त्यांची आई कवी आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. त्यांचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते आणि त्यांचे पंजोबा लला गंगा राम कपूर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक होते.
कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. ४० रुपये पगारासह, त्याची आई एक शिक्षक म्हणून काम करीत होती. वडिलांच्या आग्रहाने ते आपल्या थिएटर कंपनीत रुजू झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आधीचा विद्यार्थी असलेले त्यांच्या भावाने (रणजित कपूर) यांनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये प्रवेश घेतला. १९८१ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयतील पदवीनंतर, त्यांनी मुंबई मधील एक रुका हुआ फैसला या नाटकात ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना कौतुकाचे पत्र पाठवले आणि १९८३ च्या मंडी या चित्रपटासाठी त्यांना साइन केले.[४] पूढे १९८६ मध्ये बासु चटर्जी यांनी एक रुका हुआ फैसला चित्रपटाचे दिग्दर्शन केले व अन्नू कपूर त्याचा भाग झाले. १९८४ च्या उत्सव या चित्रपटासाठी त्यांना विनोदी भूमिका श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. १९९३ मध्ये त्यांनी सरदार चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका केली होती. हा हिंदी चित्रपट सरदार पटेल यांच्या चरित्रावर आधारित असून मुख्य भूमिका परेश रावळ यांनी केली होती. संत कबीर यांच्या भूमिकेमध्ये त्यांनी याव मालिकेमध्ये डीडी नॅशनल टीव्ही वर पण काम केले. १९९६ मध्ये त्यांनी कलापानी या मल्याळम भाषेतील चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली.
तेजाब चित्रपटामध्ये काम करत असताना अनिल कपूर या चित्रपटाचा नायकात गोंधळ टाळण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव बदलून "अन्नू कपूर" केले.[५][६]
नाना पाटेकर, मून मून सेन आणि बेंजामिन गिलानी यांनी अभिनय केलेल्या अभय या चित्रपटाचे दिग्दर्शनही कपूरने केले. या चित्रपटाला १९९४ मधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.