अपोलो टायर्स लिमिटेड ही भारतीय टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय हरियाणामधील गुरगाव (गुरुग्राम) येथे आहे. १९७२ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचा पहिला प्लांट केरळ, थ्रीसुर, पेरंब्रा येथे सुरू करण्यात आला. कंपनीचे आता भारतात चार उत्पादन युनिट्स आहेत, तसेच एक नेदरलँड्स [५] आणि एक हंगेरीमध्ये [६] आहे. भारतात जवळजवळ ५००० डीलरशिपचे जाळे आहे, त्यातील २,५०० हून अधिक केवळ याचीच दुकाने आहेत.
या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी भारतातून ६९% येते तर युरोपमधून २६% आणि ५% इतर देशांकडून येते. [७]
अपोलोने मार्च २०१६ मध्ये कंत्राटी निर्मितीसह दुचाकी टायर विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली. [८] नोव्हेंबर २०१६ मध्ये, कंपनीने आंध्र प्रदेश सरकारबरोबर दुचाकी आणि पिकअप ट्रकचे टायर तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन कारखाना स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला. [९]
युरोपमधील कंपनीच्या दुसर्या प्लांटचे उद्घाटन हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑरबान यांनी एप्रिल २०१७ मध्ये केले. [१०][११][१२]
मे २०१९ मध्ये, अपोलो टायर्सने मलेशियात आपला पहिला अपोलो ट्रक टायर झोन उघडला. [१३]