अमोल पराशर हा एक भारतीय अभिनेता आहे. तो वेब मालिका आणि चित्रपटांमध्ये लोकप्रिय पात्रांच्या अष्टपैलू चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. टीव्हीएफ ट्रिपलिंग या वेब मालिकेतील चितवन शर्मा आणि शूजित सरकारच्या सरदार उधममध्येभगतसिंग यांची भूमिका करणारे त्याचे सर्वात प्रसिद्ध पात्र आहे.
त्याने कोंकणा सेन शर्माच्या विरुद्ध डॉली किट्टी और वो चमकते सितारे, [१] आणि मनोज बाजपेयी विरुद्ध ट्रॅफिक, [२]मल्याळम थरारपटाचा हिंदी रिमेक यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. पराशर अलीकडे विनोदी चित्रपट कॅशमध्ये त्याच्या पहिल्या मुख्य भूमिकेत दिसला होता.