अरुण आईस्क्रीमस हा हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा एक भारतीय आईस्क्रीम ब्रँड आहे. ही कंपनी चेन्नैइ तामिळनाडू येथे स्थित आहे.[१][२][३]
अरुण आईस्क्रीमस १९७० मध्ये आर. जी. चंद्रमोहन यांनी एक छोटेसे उद्यम म्हणून सुरूवात केली. १९८५ मध्ये, तामिळनाडूमध्ये, या ब्रँडने आईस्क्रीमच्या विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला.
१९९९ पर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये सुमारे ७०० आउटलेट आणि २०१८ पर्यंत २३०० पार्लर तयार झाले होते. या ब्रँडचा विस्तार महाराष्ट्र व ओरिसापर्यंत झाला.[१][४]