अर्विन ब्रुस मॅकस्वीनी ( ८ मार्च १९५७, वेलिंग्टन) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १९८० च्या दशकात रिचर्ड हॅडलीच्या क्रिकेट संघातून १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.त्यात तो यष्टीरक्षक व फलंदाज राहिला.त्याने कधीही कसोटी सामने खेळले नाहीत.
त्याने सन १९८४-८५ मध्ये तरुण न्यू झीलँड संघासमवेत झिंबाब्वेचा दौरा केला व न्यू झीलँड वरिष्ठ संघासोबत सन १९८५-८६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा व नंतर श्रीलंका व शारजाचा दौरा केला.
मॅकस्वीनी १९७९ ते १९९३-९४ दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिक्टस आणि वेलिंग्टन यांच्यासाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला. १९८५-८८ च्या दरम्यान वेलिंग्टनसाठी (सेंट्रल डिस्ट्रिक्टस विरुद्ध) त्याची सर्वोच्च धावसंख्या २०५ होती तर त्याने गॅव्हीन लार्सनबरोबर पाचव्या विकेटसाठी ३४१ धावा जोडल्या होत्या.तो १९८२-८३ आणि १९८३-८४ मध्ये तसेच, १९८८ ते १९९०-९१ यादरम्यान वेलिंग्टनचा कर्णधार होता. तो 'हॉक कप' साठी हॉक बे मार्फत खेळला होता.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|