अशोकराव चव्हाण | |
![]() | |
कार्यकाळ डिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१० | |
राज्यपाल | के. शंकरनारायणन |
---|---|
मागील | विलासराव देशमुख |
पुढील | पृथ्वीराज चव्हाण |
मतदारसंघ | भोकर |
कार्यकाळ १६ मे, इ.स. २०१४ – २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
मागील | भास्करराव पाटील (खतगावकर) |
पुढील | प्रतापराव गोविंदराव चिखलीकर |
मतदारसंघ | नांदेड |
कार्यकाळ इ.स. १९८७ – इ.स. १९८९ | |
मागील | शंकरराव चव्हाण |
पुढील | व्यंकटेश काब्दे |
जन्म | २८ ऑक्टोबर, १९५८ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष (१४ फेब्रुवारी २०२४) |
मागील इतर राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९७२-२०२४) |
पत्नी | अमिता अशोकराव चव्हाण (ल. १९८४)
|
अपत्ये | सुजया व श्रीजया |
निवास | साई निलयम् , नांदेड, मुंबई व औरंगाबाद |
गुरुकुल | यशवंत महाविद्यालय, नांदेड |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
अशोक शंकरराव चव्हाण (२८ ऑक्टोबर , १९५८ - हयात) हे ८ डिसेंबर, २००८ ते ११ नोव्हेंबर, २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केली आणि ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत, ज्या दोघांनीही विधीमंडळाच्या दोन व संसदीय दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व मिळविलेले आहे.
इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघतून अशोकराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी दोनदा निवड झाली होती.
इ.स. २०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.[ संदर्भ हवा ]
१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांनी लोकसभेत सांगितल्याप्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.[१]
१२ फेब्रुवारी २०२४ रोजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला तसेच आमदारकीचा राजीनामा लगेचच विधानसभा अध्यक्षांकडे दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले.[२][३]
मागील: विलासराव देशमुख |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१० |
पुढील: पृथ्वीराज चव्हाण |