आरोग्य सेतू लोगो | |
विकासक | राष्ट्रीय माहिती केंद्र, भारत सरकार |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | एप्रिल 2020 |
संगणक प्रणाली |
|
प्लॅटफॉर्म |
|
संचिकेचे आकारमान | ३.७ एम बी |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम , पंजाबी, बंगाली, ओडिया, गुजराती आणि आसामी |
सॉफ्टवेअरचा प्रकार | आरोग्य सेवा |
संकेतस्थळ |
www |
आरोग्य सेतू (रोगापासून मुक्तीसाठी असलेला पूल) हा भारतीय अनुप्रयोग (ॲप) आहे. हे कोविड-१९ च्या माहीतीचा मागोवा घेण्यासाठी बनवलेले मोबाईल एप्लिकेशन आहे. जे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
या अॅपचा उद्देशित उद्देश कोविड-१९ रोगाबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्या संबंधित आरोग्य सेवांना भारतातील लोकांशी जोडणे हा आहे.[१] हे अॅप कोविड-१९ आरोग्य विभागाच्या पुढाकारांना आणि चांगल्या पद्धती आणि सल्ले यांना समाविष्ट करतो. हे एक ट्रॅकिंग ॲप आहे जे कोरोनाव्हायरस संक्रमणाचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टफोनच्या जीपीएस आणि ब्लूटूथ वैशिष्ट्यांचा वापर करतो. हे अॅप अँड्रॉईड[२] आणि आय ओएस मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे.[३] जर कोविड-१९ संक्रमित व्यक्ती सहा फूटांच्या आत आल्यास धोका असल्याची जाणीव करून देतो. यासाठी हे ॲप ब्लुटूथचा वापर करतो. यासाठी तो संपूर्ण भारतातील ज्ञात प्रकरणांच्या डेटाबेसद्वारे स्कॅन करून घेतो. स्थान माहिती (जी पी एस) वापरून, ते उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे ठराविक ठिकाण संक्रमित क्षेत्रापैकी आहे की नाही हे निर्धारित करते.[१]
हे अॅप पूर्वीच्या कोरोना कवच नावाच्या ॲपची अद्ययावत आवृत्ती आहे. कोरोना कवच आता बंद करण्यात आला आहे. कोरोना कवच ॲप भारत सरकारने यापूर्वी जारी केला होता.[४]
आरोग्य सेतूचे चार विभाग आहेत.
वापरकर्त्याकडून ५०० मी, १ किमी, २ किमी, ५ किमी आणि १० किमीच्या परिघात किती कोविड-१९ संक्रमित प्रकरणे आहेत हे सांगते. अॅप अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) प्रदान करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे जेणेकरून इतर संगणक प्रोग्राम, मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि वेब सेवा आरोग्य सेतूमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांचा आणि डेटाचा वापर करू शकतील.