प्रकार | सहकारी |
---|---|
स्थापना | १९५८ तामिळनाडू, भारत |
मुख्यालय | तामिळनाडू, भारत |
उत्पादने | दूध, बटर, दही, आइस्क्रीम, तूप, दुधाचे शेक, चहा, कॉफी, चॉकलेट |
महसूली उत्पन्न | ▲५,९९४ कोटी (US$१.३३ अब्ज) (२०१८ - १९) |
मालक | तामिळनाडू सरकार |
पालक कंपनी | पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग (तामिळनाडू) |
संकेतस्थळ | aavinmilk.com |
आविन हा तामिळनाडू स्थित दूध उत्पादक संघ आहे. तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे. अवीन दूध शेतकरी, दूध उत्पादकांक्डून घेतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि ग्राहकांना दूध व दुधाची उत्पादने विकतात. ही कंपनी दुध, लोणी, दही, आईस्क्रीम, तूप, दूध शेक (मिल्कशेक), चहा, कॉफी, आणि चॉकलेट यासह इतर अनेक वस्तूंचे उत्पादन करतात. [१]
राज्यातील दुग्ध उत्पादन व व्यावसायिक वितरणाचे निरीक्षण व नियमन करण्यासाठी १९५८ मध्ये दुग्धव्यवसाय विकास विभाग तमिळनाडू येथे स्थापित केला होता. दुग्धविकास विभागाने दूध सहकारी संस्थांचा ताबा घेतला. १९८१ मध्ये त्याची जागा तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडने घेतली. १ फेब्रुवारी १९८१ रोजी या सहकारी संस्थेचे व्यावसायिक उपक्रम तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडकडे हस्तांतरित केले गेले ज्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली. ट्रेडमार्क "आविन" दररोज सुमारे १.४५ करोड लिटर दूधाचे उत्पादन करते. तामिळनाडू हे दूध उत्पादनात भारतात एक आघाडीचे राज्य आहे.
तामिळ भाषेत 'आ' किंवा 'ஆ' म्हणजे 'பசு (गाय)' आणि 'பால்' म्हणजे 'दूध'. 'पसुविन पाल' ('ஆவின் பால்') 'गाईचे दूध' ('பசுவின் பால்') मध्ये अनुवादित करते.
तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेड ही १७ जिल्ह्यांची सहकारी दूध उत्पादक संघटनांची संस्था आहे. याचे मुख्यालय चेन्नई मधील माविन, माधवाराम, अवीन इलाम येथे आहे आणि चेन्नईमध्ये खालील ठिकाणी चार दुग्धशाळे आहेत. [२]
या दुग्धशाळा जिल्हा संघटनांकडून दूध संकलन करतात, प्रक्रिया करून पॅकेटमध्ये पॅक करतात आणि ग्राहकांना विक्रीसाठी पाठवितात. अंबत्तूर उत्पादन डेरी दुधाचे उत्पादन तयार करते. कोयंबटूर मधील पहिले हायटेक आविन पार्लर मार्च २०२१ मध्ये उघडेल. [३]