आशालता वाबगांवकर | |
---|---|
जन्म | आशालता वाबगांवकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | जावई विकत घेणे आहे |
आशालता वाबगांवकर (०२ जुलै १९४१ मुंबई[१], २२ सप्टेंबर २०२० सातारा) [२] ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री होत्या. कोरोना १९ या विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले.[३]
आशालता यांचा जन्म मुंबई येथे ३१ मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगांवकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. होत्या.
‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. गोपीनाथ सावकारांनी आशालता यांची रेवती या भूमिकेसाठी निवड केली.संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.[४]
त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट बासू चटर्जी यांचा 'अपने पराये'(हिंदी) हा आहे. या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले.याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्या सर्व परिचित झाल्या त्यांच्या अनेक भूमिका विशेषत्वाने लोकांना आवडल्या एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द ही महत्त्वपूर्ण राहिली अशा या कलावंताचा दुर्दैवी अंत होणे हा लोकांना चटका लावणारी गोष्ट ठरली मराठी चित्रपटसृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
छोट्या पडद्यावरील दूरदर्शन मालिकांमध्ये आशालता यांनी भूमिका केल्या आहेत.