प्राध्यापक आशिष नंदा हे भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, अहमदाबादचे सप्टेंबर २०१३ पासून संचालक आहेत.त्यांनी १९८१ मध्ये आय.आय.टी. दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक तर १९८३ मध्ये आय.आय.एम. अहमदाबादमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेन्ट या पदव्या मिळविल्या. १९८३ ते १९८८ या काळात त्यांनी टाटा अॅडमिनिस्ट्रिटिव्ह सर्व्हिस अंतर्गत टाटा मोटर्स या कंपनीत नोकरी केली.त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. १९९३ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये पी.एच.डी पदवी संपादन केली. त्यानंतर ते १९९३ ते २००६ या काळात हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये तर २००६ ते २०१३ या काळात हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक होते. सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांची नियुक्ती आय.आय.एम अहमदाबादच्या संचालकपदी झाली.