नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघ पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३]भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने जुलै २०१६ मध्ये दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या.[४] कसोटी मालिका समाप्त झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा भारतात आला.[५]
भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित डीआरएस पद्धत वापरण्यास सहमती दर्शवली.[६][७] २००८ मध्ये एकदा चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा समावेश असलेल्या द्विपक्षीय मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली गेली.[८] परंतू, हॉटस्पॉटचा वापर केला गेला नाही.[९]
सदर कसोटी मालिका ॲंथोनी डीमेलो चषकासाठी खेळवली गेली, ज्यामध्ये भारताने ५-सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.[१०] मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित करून कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली.[११] पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहिला आणि स्वतःचा १७ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम मोडला.[१२] त्याशिवाय भारताने एका वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक ९ कसोटी सामने जिंकले.[१२]
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्या आधी, महेंद्रसिंग धोणीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.[१३][१४] टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली.[१५] भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोणीचा शेवटचा सामना होता इंग्लंड XI विरुद्ध १० जानेवारी २०१७ रोजी झालेला ५०-षटकांचा सामना.[१६]
एकदिवसीय मालिकेमध्ये तब्बल २०९० धावा केल्या गेल्या, तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेमधील हा एक विक्रम आहे.[१७] सर्वच्या सर्व डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या गेल्या. भारताने एकदिवसीय आणि टी२० मालिका २-१ अशा जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ.[१८]
पीसीए मैदानावर नेट्समध्ये सरावादरम्यान लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या ह्यांना दुखापत झाली. पंड्याला संघातून वगळण्यात आले, परंतु लोकेश राहुल चवथ्या कसोटीसाठी तंदरुस्त होण्याची अपेक्षा आहे.[२८]
तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या हसीब हमीदच्या हाताला दुखापत झाल्याने, शस्त्रक्रियेसाठी त्याला मायदेशी परतावे लागले.[२९] त्याच्या ऐवजी किटन जेनिंग्सची संघात निवड करण्यात आली.[३०]
इशांत शर्माला त्याच्या लग्नासाठी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून सुट्टी देण्यात आली. त्याशिवाय दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने वृद्धिमान साहा चवथ्या कसोटीत सुद्धा खेळू शकणार नाही[३१][३२]
पदार्पणात कसोटौ शतक झळकावणारा किटन जेनिंग्स हा इंग्लंडचा पाचवा सलामीवीर तर कसोटी इतिहासातील ६९वा फलंदाज.[४८] त्याच्या ११२ धावा ह्या भारताविरुद्ध कसोटी पदार्पणात सलामीवीरातर्फे सर्वाधिक धावा.[४९]
विराट कोहलीच्या (भा) ४,००० आणि कर्णधार म्हणून २,००० कसोटी धावा पूर्ण. तसेच भारतीय कर्णधार म्हणून आणि इंग्लंड विरुद्ध भारतातर्फे सर्वाधिक वैयक्तिक धावासंख्येचा विक्रम.[५०][५१]
जयंत यादवचे (भा) पहिले शतक आणि नवव्या क्रमांकावरील भारतीय फलंदाज म्हणून पहिलेच शतक.[५१]
अलास्टेर कुक (इं) हा कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा दहावा आणि सर्वात लहान खेळाडू.[५४]
करुण नायर (भा) हा पहिल्या कसोटी शतकाचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज. तसेच कसोटी त्रिशतक करणारा दुसरा भारतीय आणि त्याच्या नाबाद ३०३ धावा ह्या इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाच्या सर्वात जास्त धावा तसेच कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजातर्फे तिसरी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या.[५५]
पहिल्या डावातील भारताची धावसंख्या ही कसोटी क्रिकेटमधील भारतातर्फे सर्वात मोठी धावसंख्या, तसेच इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च धावसंख्या[५५][५६]
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: रिषभ पंत (भा). भारतातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू.[१८]
टी२० मध्ये पाच बळी घेणारा युझवेंद्र चहल हा भारताचा पहिलाच गोलंदाज. त्याची गोलंदाजीतील कामगिरी ही आंतरराष्ट्रीय टी२० मधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय.[१८]
टी२० अर्धशतक करण्यासाठी भारताच्या महेंद्रसिंग धोणीला सर्वात जास्त (६२) डाव खेळावे लागले.[६४]
इंग्लंडच्या संघाचे ८ फलंदाज अवघ्या ८ धावांत बाद झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात वाईट कामगिरी आहे.[१८]