इंडियन ओपिनियन

इंडियन ओपिनियन वृत्तपत्राचे मुखपृष्ठ

इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधींनी सुरू केलेले एक वर्तमानपत्र होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या समुदायाला होणाऱ्या वर्णभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि त्यांना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली राजकीय चळवळीचे हे प्रकाशन हे एक महत्त्वाचे साधन होते. हे वृत्तपत्र सन १९०३ ते १९१५ या कालावधीत दर आठवड्याला इंग्रजी, गुजराती, तामिळ, आणि हिंदी अशा चार भाषेत दक्षिण आफ्रिकेत प्रकाशित होत होते.[]

इतिहास

[संपादन]

१९व्या शतकात जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही जागी ब्रिटिश शासन होते तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय लोकांना बदली कामगार म्हणून दक्षिण आफ्रिकेत आणले. तिथे इतर अनेक समुदायासारखाच भारतीय समुदायसुद्धा गोऱ्या लोकांच्या वर्णभेदाला बळी पडला.बोअर युद्धानंतर जनरल यान स्मट्स यांच्या सरकारने भारतीय समुदायाच्या नागरी हक्कावर जाचक बंधने लादली. ह्यात वॉरंटविना झडती, जप्ती आणि अटक करण्याचे हक्क पोलिसांना देण्यात आले. सर्व भारतीयांना प्रत्येकवेळी ओळखपत्र आणि नोंदणी कार्ड बाळगणे आवश्यक होते. नाताल प्रांतामध्ये वकील म्हणून काम करत असतांना, सन १९०४ मध्ये गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील युरोपियन समुदायांना भारतीय गरजा आणि मुद्द्यांविषयी शिक्षित करण्याचे हेतूने इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र सुरू केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "History of Mass Media" (PDF). University of Calicut (इंग्लिश भाषेत). 2018-06-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)