डॉ. इंद्रा हँग सुब्बा हे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचे संसद सदस्य आहेत, ते २०१९ च्या निवडणुकीत (१७वी लोकसभा) पहिल्यांदा निवडून आले आणि २०२४ निवडणुकीत (१८वी लोकसभा) पुन्हा निवडून आले.[१][२][३]
त्यांनी सिक्कीम सिक्कीम विद्यापीठातून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केली आहे.
त्यांचा जन्म पश्चिम सिक्कीममधील मानेबोंग-डेंटम मतदारसंघातील सुब्बा कुटुंबात झाला. त्यांनी हे यांगथांग वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर सिक्कीम विद्यापीठात शिक्षण घेतले.