इंद्रजित कौर बरठाकुर | |
---|---|
जन्म |
१९३४ मेघालय, भारत |
पेशा |
नागरी सेविका अर्थशास्त्रज्ञ लेखिका |
पुरस्कार |
पद्मश्री पद्मभूषण महिला शिरोमणी पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार भारत ज्योती पुरस्कार इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार |
इंद्रजीत कौर बरठाकुर या एक भारतीय नागरी सेविका, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत.[१] त्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या (एन ई सी) सदस्या आहेत. ज्यात त्यांना केंद्र सरकारच्या राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.[२] त्यांनी कविता, कथा आणि पाककृतीची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.[३] आणि सो फुल सो अलाइव्ह[४] आणि स्टोरीज टू विन द वर्ल्ड[५] या काही उल्लेखनीय कामे आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सचिव म्हणून काम केले आणि १९९० मध्ये भारतीय अर्थशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा होत्या.[१]
महिला शिरोमणी पुरस्कार (१९८९), आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार (१९९२), भारत ज्योती पुरस्कार (२००८) आणि इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार (२०११) यासारख्या पुरस्कारांच्या त्या प्राप्तकर्त्या आहेत.[१] भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आणि त्यानंतर २००९ मध्ये पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले.[६]