इप्पात्सु किकी मुझुम | |
चित्र:Ippatsu Kiki Musume 1.png प्रथम टॅंकोबोन व्हॉल्यूम कव्हर | |
イッパツ危機娘 | |
---|---|
शैली | विनोदी[१] |
Manga | |
Written by | शिगेमिट्सु हराडा |
Published by | कोडांशा |
Imprint | यंग मॅगझिन केसी स्पेशल |
Magazine | विकली यंग मॅगेझीन |
Demographic | सीनेन मंगा |
Original run | १९ जानेवारी १९९८ – ७ फेब्रुवारी २००० |
Volumes | ६ |
Anime | |
Directed by | हिरोयोशी योशिदा |
Produced by |
तेत्सुओ गेन्शो योशियुकी ओचिया |
Written by | शिनिचिरु मिनामी |
Studio | ग्रूप टीएसी |
Released | ५ ऑक्टोबर १९९९ – २९ ऑक्टोबर १९९९ |
इप्पात्सु किकी म्यूझ्यूम ( जपानी: イッパツ危機娘, शब्दशः अर्थ. "अचानक संकटात सापडणारी मुलगी"), ज्याला मिस क्रिटिकल मोमेंट देखील म्हणले जाते. ही एक जपानी मंगा मालिका आहे. ही मालिका शिगेमिट्सु हराडा यांनी लिहिलेली आणि सचित्र केली आहे. जानेवारी १९९८ ते फेब्रुवारी २००० या काळात कोडांशाच्या सीनेन मंगा या साप्ताहिक तरुण मासिकात हे प्रकाशित झाले होते. जुलै १९९८ ते मार्च २००० या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या सहा टँकोबोन खंडांमध्ये ते छापले गेले.[२][३] या मंगामध्ये कुनयान नावाच्या महिलेचे आणि तिच्या बर्याच विनोदी दुर्दैवाचे किस्से दर्शविले आहेत.
याचे ग्रुप टीएसी द्वारे ॲनिम मालिकेत रूपांतरित केले गेले होते. मूळतः ऑक्टोबर १९९९ मध्ये टीबीएस वर याचे प्रसारण केले गेले होते.[४]
कुनयान ही चीनमधील २० वर्षांची आंतरराष्ट्रीय विद्यार्थीनी आहे. ती हुशार, सुंदर आणि ऍथलेटिक आहे. तथापि, तिच्या मद्यपानाच्या वाईट सवयींमुळे (ज्याचा उल्लेख कधीच केला जात नाही किंवा ॲनिममध्ये दाखवला जात नाही), ती नेहमेच्या दैनंदिन जीवनात अनेक संकटात सापडत असते.
इप्पात्सु किकी म्यूझ्यूम हे शिगेमित्सु हरदा यांनी लिहिलेले आणि चित्रित केले आहे. हे वीकली यंग मॅगझिनमध्ये जानेवारी १९९८ ते फेब्रुवारी २००० या कालावधीत प्रसारीत करण्यात आले होते. त्यातील ८१ अध्याय सहा टँकोबोन खंडांमध्ये एकत्रित केले गेले होते. ते जुलै १९९८ ते मार्च २००० पर्यंत प्रसिद्ध झाले होते.
क्रमांक | जपानमधील प्रसारणाची तारीख | जपानी आयएसबीएन |
---|---|---|
१ | ३ जुलै १९९८ | ९७८-४-०६-३३६७४८-५ |
२ | ५ जानेवारी १९९९ | ९७८-४-०६-३३६७७८-२ |
३ | १ मे १९९९ | ९७८-४-०६-३३६८०१-७ |
४ | ४ ऑगस्ट १९९९ | ९७८-४-०६-३३६८२१-५ |
५ | ३ डिसेंबर १९९९ | ९७८-४-०६-३३६८४२-० |
६ | ३ मार्च २००० | ९७८-४-०६-३३६८५६-७ |
ग्रुप टीएसी द्वारे रुपांतरित केलेली १६-एपिसोड ॲनिमे मालिका टीबीएस वर ५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर १९९९ या काळात वंडरफुल (ワンダフル ) टीव्ही व्हरायटी शोवर प्रसारित झाली.[५] प्रत्येक भागाचा रनटाइम ३ मिनिटांचा होता.
क्रमांक | जपानी प्रकाशन तारीख | जपानी आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक |
---|---|---|
१ | ३ जुलै १९९८[६] | आयएसबीएन 978-4-06-336748-5 |
२ | ५ जानेवारी १९९९[७] | आयएसबीएन 978-4-06-336778-2 |
३ | १ मे १९९९[८] | आयएसबीएन 978-4-06-336801-7 |
४ | ४ ऑगस्ट १९९९[९] | आयएसबीएन 978-4-06-336821-5 |
५ | ३ डिसेंबर १९९९[१०] | आयएसबीएन 978-4-06-336842-0 |
६ | ३ मार्च २०००[११] | आयएसबीएन 978-4-06-336856-7 |