इला अरब मेहता | |
---|---|
![]() १९९५ मधील फोटो | |
जन्म |
१६ जून, १९३८ मुंबई, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | गुजराती |
साहित्य प्रकार | कादंबरीकार आणि कथा लेखिका |
वडील | गुणवंतराय आचार्य |
स्वाक्षरी |
![]() |
इला अरब मेहता (जन्म १६ जून १९३८) ह्या भारतातील गुजरात येथील गुजराती कादंबरीकार आणि कथा लेखिका आहेत.
मेहता यांचा जन्म १६ जून १९३८ रोजी मुंबई येथे गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांच्या घरी झाला. त्यांचे कुटुंब जामनगरचे होते. त्यांनी जामनगर, राजकोट आणि मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रामनारायण रुईया कॉलेजमधून १९५८ मध्ये गुजरातीसह बीए आणि १९६० मध्ये एमए पूर्ण केले. १९६० ते १९६७ या काळात त्यांनी रुईया कॉलेजमध्ये आणि नंतर सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे १९७० ते २००० मध्ये निवृत्तीपर्यंत अध्यापन केले.[१][२][३][४]
त्यांच्या सुरुवातीच्या काळात मेहता त्यांनी अखंड आनंद, नवनीत आणि स्त्री जीवन या मासिकांमध्ये लेखन केले. त्यांनी त्रिकोनी त्राण रेखाओ (१९६६), थिजेलो आकर (१९७०), राधा (१९७२), एक हाता दिवाण बहादूर (१९७६), बत्रीस लक्षो (१९७६), वरसदार (१९७८), आवती कालनो सूरज (१९७९), यासह अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बत्रीस पुतलिनी वेदना (१९८२), अने मृत्यु (१९८२), दरियानो मानस (१९८५), वसंत छल्के (१९८७), नाग परिक्षा, पंच पागल पृथ्वी पर (१९९५), द न्यू लाइफ (२००४), परपोतानी पंख (१९८८), जिली मी कुंपल हथेलिमा (२००७), जहेरखाबर्नो मानस (१९८५), शबने नाम होतू नथी (१९८१) या वेगवेगळ्या विषयांच्या कादंबऱ्या आहेत.[१][२][४] त्यांची कादंबरी वाद (२००१) रीटा कोठारी यांनी फेंस (२०१५) म्हणून इंग्रजीत अनुवादित केलेली आहे.[५] त्यांची बत्रिस पुतलिनी वेदना ही कादंबरी ही महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची आणि स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची कथा आहे. ही कादंबरीच्या मुख्य नायिका अनुराधाभोवती केंद्रित आहे आणि कुंदनिका कपाडियाच्या सात पगलन आकाश (सेव्हन स्टेप्स इन द स्काय; १९९४) प्रमाणेच तिचा पुरुषी अराजकता विरुद्धचा राग सादर करते.[६]
एक सिगारेट एक धुपसळी (१९८१), व्हिएना-वुड्स (१९८९), भाग्यरेखा (१९९५), बलवो बलवी बलवू (१९९८), योम किप्पूर (२००६), इला आरब मेहतानो वार्ता वैभव (२००९) हे त्यांचे कथासंग्रह आहेत. वर्षा अडालजानी श्रेष्ठ वार्ता (१९९१) या वर्षा अडालजा यांच्या निवडक कथा तिने संपादित केल्या आहेत.[१][२][४]
मृत्यु नाम परपोटा मारे (१९८४) हे तिचे विविध लेखकांच्या मृत्यूवरील साहित्यकृतींचे संकलन आहे.[२]
त्यांचे लेखन स्त्रीवादी मानले जाते.[७][८]
त्यांना गुजरात साहित्य अकादमी, महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमी, आणि गुजराती साहित्य परिषद यांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.[२]
त्यांनी १९६४ मध्ये अरब मेहता या डॉक्टरशी लग्न केले. त्यांना एक मुलगा, सलील आणि एक मुलगी, सोनाली आहे. त्या मुंबईत राहतात. त्यांचे वडील गुणवंतराय आचार्य आणि तिची धाकटी बहीण वर्षा अडलजा हे देखील गुजराती लेखक आहेत.[२][८]