उत्तर विभागीय परिषद ही भारतातील एक विभागीय परिषद आहे ज्यात चंडीगड, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि लडाख या उत्तर भारतीय राज्यांचा आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.[१][२]
या राज्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सल्लागार समिती असलेल्या सहा विभागांमध्ये या राज्यांचे गट करण्यात आले आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ च्या भाग-IIIच्या अंतर्गत पाच विभागीय परिषद स्थापित केल्या गेल्या.[१][२][३]