उत्तरा

उत्तरा ही अभिमन्यूची पत्‍नी होती. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती. तिला अर्जुनाने बृहन्नडा वेशात नृत्याचे प्रशिक्षण दिले.

परीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले.