उदयन माने (२४ फेब्रुवारी, १९९१:बेंगलुरु, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय व्यावसायिक गोल्फर आहे. तो एशियन टूर आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियावर खेळतो. [१] [२] हा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या ११ स्पर्धा जिंकला आहे.
मानेने २०१४ आशियाई खेळ आणि २०१४ आयझेनहॉवर चषक या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [३]
मानेने तोक्यो, जपान येथे झालेल्या २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले.[४] [५] [६] [७]