उमा रामकृष्णन या भारतीय आण्विक पर्यावरणशास्त्रज्ञ असून त्या बंगळूर येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रीसर्च (टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये संलग्न प्राध्यापिका आहेत. तेथे त्या आग्नेय आशियाचे लोकसंख्या जननशास्त्र, सस्तन प्राण्यांचा उत्क्रांति- इतिहास, त्यांचे संरक्षण आणि जीवविज्ञान यांवर काम करतात.[१]बंगलोरच्या प्रयोगशाळेत त्यांचे व्याघ्र निरीक्षण आणि त्यांच्या लॅंडस्केप/जनसंख्या अनुवांशिकी अभ्यासण्यासाठी व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यांतील काही प्रकल्पांमध्ये कमीतकमी आणि जंगली कृत्रिमता यांच्यामध्ये लोकसंख्येचा फरक करण्यावर काम करणे आणि पश्चिम घाटातील पर्वतश्रेणीतील पक्षी समुदायांमध्ये विविधता आणणारे ड्रायव्हर समजणे यांचा समावेश आहे. सध्या त्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी (जीवशास्त्र आणि सीईएचजी)ला फुलब्राईट फेलो म्हणून भेट देत आहेत.
उमा रामकृष्ण या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्सच्या पदवीधर आहेत.. नंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्यान सॅन दिएगो येथून पीएचडी केले. त्यांच्या प्रबंधाचा वि़षय जनसंख्या, अनुवांशिक गुंधर्म आणि सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास, विशेषतः आनुवांशिक फरकांवर वीण प्रणालीचे परिणाम हा होता. त्यांचे पोस्ट-डॉक्टोरल संशोधन, हवामानातील बदलांच्या आनुवंशिक परिणामांवर केंद्रित होते. २००५ मध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने त्यांना विज्ञान संशोधक पदवी देऊन सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी बंगलोरच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या आवारात प्रयोगशाळा उभारली.[२]
आग्नेय आशियाधील जीनोमिक इतिहासाच्या माध्यमातून पुरातन मानवी लोकसंख्यांची माहिती मिळवणे हे त्यांच्या प्रयोगशाळेचे ध्येय आहे. भारतीय उपखंडातील अस्तित्वाला धोका असलेल्या वाघ, भारतीय जंगली मांजर, चित्ता आणि मकाक माकड यांसारख्या सस्तन प्राण्यांचे संरक्षण, वाघांच्या मिश्र नमुन्यांसह जनसंख्या निरीक्षण आणि लॅंडस्केप/जनसंख्या अनुवांशिकी यांच्या अभ्यासाठी त्यांनी एक विशेष पद्धत अवलंबली आहे. २०१५ सालापासून त्या पश्चिम घाटातील पर्वतीय पक्षी समुदायांमधील विविध प्रकारच्या वैविध्यपूर्ण घटकांवर काम करीत आहेत. त्या राष्ट्रीय वन्यजीवन बोर्डावर असून, रामानुजन फेलो आणि डीएई आउटस्टॅंडिंग सायंटिस्टच्या सदस्या आहेत.२०१५-२०१६ शैक्षणिक वर्षासाठी त्यांना स्टॅनफर्ड विद्यापीठात फुलब्राइटची अभ्यासवृुत्ती मिळाली आहे..[३]